
प्रसार माध्यमे आणि सामाजिक परिवर्तन भारतीय स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या मुलभुत हक्कापेक्षा अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा लाभ होऊन एक नवी जीवनदृष्टी लाभल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांनी आपले स्थान निर्वीवाद निर्माण केले. ब्रिटीश राजवटीमध्ये भारतात गोपनियतेचा कायदा लागू केला गेला होता. या कायद्यामुळे प्रशासकीय स्तरावरील विविध प्रकारच्या माहितीपासून प्रसार माध्यमांना व नागरिकांना वंचित रहाव लागत होते. आता भारत सरकारने संपुर्ण देशात जनतेला माहितीचा अधिकार प्रदान केल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांचे स्थान आणि भारतातील नागरिकांचे मुलभूत हक्क अधिक मजबूत झाले आहेत. प्रशासकीय स्तरावरील कामकाज पुर्णःपारदर्शक करण्याबरोबरच माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामुहिक विकासाच्या प्रक्रियेला गती देऊन सर्वांगीन विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी माहिती अधिकाराला प्रसार माध्यमांची जोड दिली तर सर्वांगीण विकासाचे चक्र अधिक गतीमान करता येईल व त्यातून सामुहिक विकासाचे फळ अखेरच्या घटकांपर्यंत पोहचविणे शक्य होईल. माहिती अधिकार व प्रसार माध्यमे या दोन्ही परस्पर पुरक व परस्प...