
प्रसार माध्यमे आणि
सामाजिक परिवर्तन
प्रसार माध्यमे आणि
सामाजिक परिवर्तन
भारतीय स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या मुलभुत हक्कापेक्षा अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा लाभ होऊन एक नवी जीवनदृष्टी लाभल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांनी आपले स्थान निर्वीवाद निर्माण केले. ब्रिटीश राजवटीमध्ये भारतात गोपनियतेचा कायदा लागू केला गेला होता. या कायद्यामुळे प्रशासकीय स्तरावरील विविध प्रकारच्या माहितीपासून प्रसार माध्यमांना व नागरिकांना वंचित रहाव लागत होते. आता भारत सरकारने संपुर्ण देशात जनतेला माहितीचा अधिकार प्रदान केल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांचे स्थान आणि भारतातील नागरिकांचे मुलभूत हक्क अधिक मजबूत झाले आहेत. प्रशासकीय स्तरावरील कामकाज पुर्णःपारदर्शक करण्याबरोबरच माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामुहिक विकासाच्या प्रक्रियेला गती देऊन सर्वांगीन विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी माहिती अधिकाराला प्रसार माध्यमांची जोड दिली तर सर्वांगीण विकासाचे चक्र अधिक गतीमान करता येईल व त्यातून सामुहिक विकासाचे फळ अखेरच्या घटकांपर्यंत पोहचविणे शक्य होईल. माहिती अधिकार व प्रसार माध्यमे या दोन्ही परस्पर पुरक व परस्परांशी निगडीत बाबी आहेत.
प्रसार माध्यम ही प्रतिमा निमिर्ती व विचार परिवर्तनाची आणि नवी नवी माहिती प्रसारणाची महत्वाची साधनं असतात तर समाज व प्रशासन हे माध्यमांना ‘हार्ड न्युज देणारे’ असतात. दुस-या महायुद्धानंतर जगभर विकसीत झालेल्या प्रगत ज्ञान शाखापैकी विकास संवाद ही एक मौलिक शाखा आहे. या संदर्भात माध्यम तज्ञ डॉ.वि.ल.धारूरकर यांनी विकास संवादाची नवी क्षितीजे या ग्रंथात म्हटले आहे की, ‘समाजात घडत असलेले रचनात्मक बदल नोंदविणे व ते गतिमान करणे हा विकास संवादाचा आत्मा होय.’ (2)विविध क्षेत्रात प्रसार माध्यमे विकासाला पोषक वातावरण निर्माण करतात आणि अशा वातावरणातुन संस्थात्मक जीवनाचे बदलते चित्र व सामाजिक बांधिलकीची भावनाही रूजू लागते.विकसनशील राष्ट्रांमध्ये नवीन जिवनमुल्ये रूजविण्याचे काम प्रसार माध्यमे करतात.
प्रसारमाध्यमांची मानसिकता विविध पक्षांच्या चरणी वाहिलेली आहे त्यांच्या अशा वागण्याने समाजाला विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.प्रसारमाध्यमे इतिहास घडवत नाहीत, ते फक्त इतिहासाचे साक्षिदार ठरतात मात्र ते हा इतिहास घडवण्यात मोलाची भुमिका बजावत असतात. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही वृत्तपत्रांनी, वाहिन्यांनी ज्या प्रकारे वार्ता प्रसिद्ध करण्यासाठी वा न करण्यासाठी पैसे स्वीकारून पत्रकारितेतील एक अनिष्ट प्रथा रुढ करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र विधानसभेच्या 2009 वेळच्या निवडणुकीत जो ‘पैशाचा खेळ’ झाला त्यात मिडिया फार काही मागे नव्हता. अर्थात सगळाच मिडिया या खेळात सहभागी झाला असे नाही म्हणता येणार. पण मोठया प्रमाणावर उतरला होता एवढे नक्की. पुन्हा छोटी मोठी लंगोटी वृत्तपत्रे अथवा स्थानिक चॅनेल्सच त्यात होती असेही नाही. शक्तिशाली आणि मोठमोठी वृत्तपत्रे आणि चॅनेल्सही या खेळात उतरली होती. अनेक उमेदवारांनी ‘खंडणीखोरी’ची तक्रार केली. परंतु मीडियाच्या भीतीने ही तक्रार तडीला नेण्याचे धैर्य कोणी दाखविले नाही हा भाग वेगळा. या पैशाच्या खेळाने अनेक वरिष्ठ, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांनाही अडचणीत आणले आणि यातुनच माध्यमे कशी पूर्वग्रह दुषित आहेत याचा प्रत्यय येतो. उमेदवार, पैसा, सेलिब्रिटी, प्रसार माध्यमे या सगळ्या गोष्टी हातात घालून चालू लागल्या आहेत, ही दु:खाची बाब आहे. पैसा आणि मिडिया हे एका शेंगेतल्या दोन बियांसारखे बनले आहेत. मात्र यामुळे छोटे, पैसे खर्च करण्याची फारशी कुवत नसलेले आवाज पूर्णपणे दाबले जात आहेत हे कुणीच लक्षात घेत नाही. याचा परिणाम सामान्य जनतेवरही होतो. त्यांच्यासाठी लढणार्यांचा आवाजच या प्रक्रियेत दाबला गेला आहे. ब्रायन नाईट आणि टीम ग्रोस्लोस यांनी केलेल्या रिसर्च मध्ये ही बाब पाहणीत आली की आताची माध्यमे ही पृवाग्रहादुषित आहेत आणि त्यामुळे समाज हा दिशाहीन होत चालला आहे समाजात आज माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते आणि त्याच चौथ्या स्तंभाला आज अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध संस्था कीड लावत आहे आणि ही बाब अतिशय खेदजनक आहे यासाठी म्हणून 2004 मध्ये काही सर्वे केले गेले आणि त्यातून हे सिद्ध झाल आहे की माध्यमे ही एकाच प्रवाहाने जात आहेत आणि हा प्रवाह ज्यांनी त्यांना विकत घेतले आहे त्यांनी सांगितलेल्या दिशेने आहे आणि हे पत्रकारितेच्या दृष्टीने गुन्हा आहे.तरीही आजच्या घडीला हा प्रवास राजरोसपणे चालला आहे.त्यात एबीपी माझा काँग्रेस च्या बाजुने सामना शिवसेनेच्या बाजुने लोकमत काँग्रेस च्या बाजुने प्रहर नारायण राणेच्या बाजुने बोलताना दिसतात.कॅश फोर वोट या प्रकारात माध्यमांनी घेतलेली भूमिका ही खुप चुकीची होती.त्याच प्रमाणे पूर्वी पण दिल्ली मध्ये बलात्कार होत होते मात्र आताच ही बाब माध्यमे उचलुन धरत आहेत कारण ही बाब खुप मोठी झाली.त्याच प्रमाणे जेव्हा धरती बुडणार अशी अफवा आली तेव्हा माध्यमांनी पण समाजप्रबोधन न करता केवळ टीआरपी साठी ही बाब उचलुन धरली मात्र अशी धारणा करणे किवा असे वागणे हे समाजाबरोबरच माध्यमांसाठी ही हानिकारक आहे.त्यामुळे माध्यमांनी समाजाची गरज ओळखुन आणि स्वतःची जबाबदारी समजुन घेऊन आपले काम करणे गरजेचे आहे तरच समाज योग्य दिशेने प्रगती करू शकेल .
खरे पाहता प्रसार माध्यमांना सामाजिक बदलाची माध्यमे म्हणून संबोधले जाते.डेनिस मक्वेल माध्यमांना इंजिन ऑफ सोशल चेंज असे म्हणतात आज प्रसारमाध्यमाचे स्वरूप बहुआयामी बहुउदेशीय झाले आहे. माध्यमे अधिक गतिमान अधिक व्यापक अधिक परिणामकारक झाली आहेत. या तंत्रज्ञानाचा दुरुपयोगही होताना दिसत आहे. त्याचे अनेक परिणाम व उदाहरणे समोर आल्याने समाजात एक अस्वस्थता आहे. विशेष करून युवकवर्गाला अमली पदार्थाच्या व्यसनात गुंतविण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. तसेच अश्लील संदेशांची देवाण-घेवाण व त्यातून निर्माण झालेली गुन्हेगारी स्वरूपाची गुंतागुंत ही चिंतेचा विषय बनली आहे. जग जवळ आले ; पण माणसे मात्र एकमेकांपासून दूर गेली असे दिसते. ही भावनिक अलगता अनेक सामाजिक ताणतणाव निर्माण करीत आहे. परस्परांशी बोलायला , समजून घ्यायला , वेळ नाही किंवा त्याची आवश्यकता नाही , यातूनदेखील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत आहे.माध्यमे ही परिणामकारक आहेत मात्र ती काही प्रमाणात समाज विघातक ही आहेत. डेनिस मक डोनाल्ड यांनी जो रिसर्च मांडला या नुसार विसाव्या शतकातील माध्यमांचा विचार केला तर ज्याप्रमाणे दुसर्या महायुद्धात माध्यमांनी महत्वाची भुमिका बजावली तशी आता माध्यमे ही जास्त करून नफा आणि तोटा याचा जास्त विचार करताना दिसतात त्यामुळेच की काय आज माध्यमांवर ताशेरे ओढले जात आहेत.मात्र प्रसार माध्यमांचे सर्वात महत्वाचे आव्हान कोणते असेल तर राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले पाहिजे. समाजजीवनातील उत्तमोत्तम सद्गुणाची जोपासना प्रसिद्धी माध्यमांनी करावी. लोकशिक्षण, राजकीय शिक्षण, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक उद्बोधन, सांस्कृतिक अभियान अशा गोष्टींसाठी वेळ प्रसार-माध्यमांनी दिला पाहिजे. माध्यमे ही आज सर्वसामान्यांच्या जीवनात आपले वेगळे स्थान निर्माण करून आहे.म्हणूनच की काय समाजाची निर्मिती व्यवस्थेमध्ये माध्यमे ही हातभार लावत आहेत. या साठी ज्या 5 रिसर्च पेपर चा आढावा घेतला तेव्हा लक्षात आले की माध्यमांचा परिणाम अभ्यासताना अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून लोकांवरील परिणाम दर्शवला आणि निष्कर्ष काढला. खरे पाहता माध्यमांचा परिणाम हा हायपोडर्मिक मॉडेल प्रमाणे आहे ज्या प्रमाणे सुई द्वारे एखादे औषध थेट शरीरात जाते त्या प्रमाणे माध्यमांचा परिणाम ही थेट लोकांच्या मनावर होत असतो. माध्यमांचा परिणाम हा व्यक्ती नुरूप हा बदलत असतो मात्र त्यात ही माध्यमांमधील काय स्वीकारावे आणि काय स्वीकारू नये आणि मुलांना ही काय पाहायला द्यावे हे सर्वस्वी आपल्यावर आहे आणि त्यानुसार माध्यमाचा चांगला किवा वाईट परिणाम हा आपल्यावर पडेल.
व्हायला हवा. जी गावे, खेडी आज रस्त्यांनी, रेल्वे ने शहरांना जोडली नाहीत, ती या टेलिकॉम सेवेमुळे कमी खर्चात जोडली जातील. शहरांशीच नाही तर, जगाशी जोडले गेल्याने माहिती, ज्ञान, व्यापाराच्या अमाप संधी त्यांना उपलब्ध होतील. आजच्या काळाला धरून इ-शाळा, इ-शेती, इ-आरोग्य, इ-बँकिंग क्षेत्रातील सुविधा ग्रामीण जनतेला उपलब्ध होतील.
नजीकच्या काळामध्ये दूरसंचार क्षेत्राची वाढ ही 20% वेगाने होणार आहे, तर या क्षेत्रातील नोकरीच्या संधी दरवर्षी 7% वेगाने वाढतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या क्षेत्राचे मोल ओळखून राज्य शासनाने योग्य ती पावले वेळीच उचलली पाहिजेत.
स्पेक्ट्रम उपलब्ध करून देणे, दुर्गम भागात या सेवा पोचवाव्यात म्हणून कंपन्यांना योग्य त्या सवलती देणे, तसेच केबलचे जाळे टाकता यावे म्हणून धोरणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाचे स्वतंत्र टेलिकॉम मंडळ निर्माण करायला हवे. या क्षेत्रात कार्यरत असणार्या कंपन्यांना एकमेकांचे जाळे तसेच अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरण्यासाठी त्यांनी एकमेकांना सहकार्य करावे म्हणून हे मंडळ काम करेल. तसेच स्थानिक प्रशासन संस्थांना विश्वासात घेऊन हे मंडळ काम करेल.
सोशल मिडिया
संगणकाच्या माध्यमातून सामाजिक माध्यमांनी (सोशल मिडिया) आज जगभरात क्रांती घडवली आहे. विशेषतः तरुण वर्ग या माध्यमांकडे जास्त आकर्षित होत आहे. संगणकाचा प्रचार आणि प्रसार इतका झाला आहे कि आज 30 ते 40 टक्के मध्यमवर्गीयांच्या घरात संगणकाचा वापर केला जातो. याच संगणकाचा वापर करून प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अगदी जवळच्या आणि सातासमुद्र पार असणार्या आपल्या मित्राशी, मैत्रिणीशी, नातेवाईकांशी, सहकार्यांशी सामाजिक माध्यमांच्या मदतीने बोलता येते. सध्या जगभरात सामाजिक माध्यमांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.
परंतु सामाजिक माध्यमांचा वापर करायचा असेल तर केवळ संगणक असून चालत नाही तर त्यासाठी इंटरनेटची सुविधा देखील असणे गरजेचे असते. फेसबुक, ट्वीटर, ऑर्कुट अथवा स्वतःचा ब्लॉग या सामाजिक माध्यमांचा वापर करून आज जगातील करोडो लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. अत्याधुनिक तंत्राज्ञानाच्या सहायाने भ्रमणध्वनीद्वारे (मोबाईल) देखील सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपण समाजाच्या संपर्कात राहू शकतो. कधीही, कुठेही कितीही लांब असून सुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहता येते त्याचबरोबर समाजात घडणार्या घडामोडी काही सेकँदाच्या आत आपल्याला कळतात व त्यावर आपली प्रतिक्रियाही नोंदविता येते हे याचे फायदे आहेत.
परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात तसे या माध्यमांचे तोटे देखील आहेत. माणूस-माणसापासून तोडला जाणे (प्रत्यक्ष भेटी पेक्षा या माध्यमातून संपर्कात राहणे), फेसबुक अथवा ऑर्कुट वरील आपल्या प्रोफेलचा गैरवापर किंव्हा हेक होणे (विशेषतः मुलींचे) यांसारखे धोके पत्करण्याची तयारी या माध्यमांचा वापर करताना आपल्याला ठेवावी लागते. आधुनिक युगाच्या बरोबरीने जायचे असेल तर सामाजिक मध्यामंचा वापर करावाच लागेल, परंतु आपल्या वैयक्तिक गोष्टी समाजासमोर किती मांडायचा याचा देखील विचार करणे आवश्यक आहे.
राजू वामनराव जोंधळे
मो. ९९६०१६१८६२
मो. ९९६०१६१८६२
Mahendra bhrungalem
जवाब देंहटाएं