प्रसार माध्यमे आणि सामाजिक परिवर्तन भारतीय स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या मुलभुत हक्कापेक्षा अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा लाभ होऊन एक नवी जीवनदृष्टी लाभल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांनी आपले स्थान निर्वीवाद निर्माण केले. ब्रिटीश राजवटीमध्ये भारतात गोपनियतेचा कायदा लागू केला गेला होता. या कायद्यामुळे प्रशासकीय स्तरावरील विविध प्रकारच्या माहितीपासून प्रसार माध्यमांना व नागरिकांना वंचित रहाव लागत होते. आता भारत सरकारने संपुर्ण देशात जनतेला माहितीचा अधिकार प्रदान केल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांचे स्थान आणि भारतातील नागरिकांचे मुलभूत हक्क अधिक मजबूत झाले आहेत. प्रशासकीय स्तरावरील कामकाज पुर्णःपारदर्शक करण्याबरोबरच माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामुहिक विकासाच्या प्रक्रियेला गती देऊन सर्वांगीन विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी माहिती अधिकाराला प्रसार माध्यमांची जोड दिली तर सर्वांगीण विकासाचे चक्र अधिक गतीमान करता येईल व त्यातून सामुहिक विकासाचे फळ अखेरच्या घटकांपर्यंत पोहचविणे शक्य होईल. माहिती अधिकार व प्रसार माध्यमे या दोन्ही परस्पर पुरक व परस्प...
इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट
वर्षावास अर्थात गुरु पौर्णीमा
वर्षावास वर्षावास ज्याला पाली भाषेत वसावास म्हणतात. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास थांबणे, वसणे असा अर्थ होय. बौद्ध परंपरेनुसार, आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून पर्जन्यवृष्टी सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संपते. हा पाऊस चार महिने टिकतो. म्हणून त्याला चातुर्मास देखील म्हणतात. या वेळी, बौद्ध भिक्षू बुद्ध विहारांपैकी एकामध्ये अभ्यास करतात, ध्यान करतात, ज्ञान घेतात, त्यानंतर वर्षाच्या उर्वरित महिन्यात चरिकाला भेट देतात किंवा चरिकाकडे जातात. १. आषाढ : महिन्याच्या पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम यांनी मानवतेच्या कल्याणासाठी गृहत्याग केला, याला महाभिनिश्चक्रमण म्हणतात. याच दिवशी, बोधगयामध्ये ज्ञानप्राप्ति झाल्यानंतर सारनाथ / इसई पट्टान यांनी पंचवग्गी भिक्षूंना प्रथमच धम्म उपदेश केला. पहिले ज्ञान दिले. म्हणून त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. २. श्रावण : या महिण्याच्या समाप्तीनंतर इ.स. ४८३ बौद्धधम्म परिषदेच्या अध्यक्षतेखाली मगध राजा बिम्बिसारचा मुलगा अजातशत्रु याच्या कारकिर्दीत राजगृहातील सप्तपर्णी ...
जागतिकीकरण
जागतिकीकरण Globalization जागतिकरण म्हणजे नक्की काय आणि त्याचे उद्दिष्ट काय यापासून.यासाठी मागे जायला हवे मानवजातीच्या विकासाच्या एका जुन्या टप्प्यात--जेव्हा राष्ट्र ही संकल्पना उदयास यायची होती. माणूस अजूनही गुहेतच राहत होता. मूलभूत गरजांपैकी अन्न ही गरज माणूस शिकार करून भागवत होता. वस्त्र म्हणून फारतर जनावरांची कातडी वापरत होता.आणि निवारा म्हणून गुहा होत्याच.अशा अत्यंत कमी गरजा असलेल्या काळात प्रत्येक माणूस आपापली शिकार करून राहू शकत होता.त्यासाठी इतरांवर अवलंबून राहायची गरज नव्हती. नंतरच्या काळात मानवी संस्कृतीचा विकास झाला आणि माणूस छोट्या समूहाने पाण्याच्या स्त्रोताजवळ वस्ती करून राहू लागला.माणसाच्या गरजाही आता वाढल्या.अन्न म्हणून केवळ शिकारीवर अवलंबून न राहता धान्य पिकवले जाऊ लागले.वस्त्राचीही माणसाला गरज भासू लागली.निवारा म्हणून छोटी घरे गरजेची झाली.एकदा घरे झाल्यावर आत लोखंडी, लाकडी, तांबे-पितळेच्या वस्तू गरजेच्या झाल्या.शेतीसाठी नांगर,वाहतुकीसाठी बैलगाड्या आणि रथ गरजेचे झाले. हौस म्हणून सोन्या-चांदीचे दागिनेदेखील गरजेचे झाले. समाजाचे हिंस्त्र श्वापदे आणि शत्रू यापासून संरक्...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें